‘सत्ता असो वा नसो त्याला फार किंमत देत नाही. पण मात्र, जोपर्यंत ताकद आहे. तोवर तुमच्या सगळ्यांसाठी लढणार.'म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थितांची मनं जिंकली. उदयनराजेंच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्त उदयनराजेंनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली.. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ..
सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. मला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या शरद पवार आणि तुम्हा सर्वच लोकांचे आभार मानतो. जेव्हा सर्व मान्यवर त्यांचे मनोगत व्यक्त करत होते, तेव्हा मी इकडे-तिकडे आवर्जून पाहत होतो की, इथं कोणी हरभऱ्याचं झाड लावलं आहे का?... कारण नसताना माझी स्तुती केली, त्यामुळे माझं मन भारावून गेलं. पण खरं सांगतो. काल, आज आणि उद्या जे करणार ते तुम्हा सगळ्यांना आणि या मान्यवरांना केंद्रबिंदू ठेऊन, माझं कर्तव्य म्हणून करणार. त्यात कुठेही कमी पडणार नाही. असं उदयनराजे यावेळी म्हणाले.
‘सत्ता असो वा नसो त्याला फार किंमत देत नाही. पण मात्र, जोपर्यंत ताकद आहे. तोवर तुमच्या सगळ्यांसाठी लढणार. आपण सर्व वेळ काढून आलात त्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली. अनेकांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना माझं एवढं कौतुक केलं. मला वाटलं आता मला डायबेटिस व्हायचा. पण खरोखर ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की, आपल्या सर्वांचं प्रेम कायमस्वरुपी मिळत राहो. यामुळे काम करत राहण्याची एक उर्जा मिळते.’ असं बोलत उदयनराजे काही क्षण भावुक झाले.
‘आज फार बोलण्यापेक्षा फक्त एकच सांगेन की, आपण एवढं प्रेम दिलं त्यानेच मी धन्य झालो. मला आज शब्द अपुरे पडतात. फक्त एवढीच विनंती करतो. मी सुद्धा तुमचा सारखाच एक माणूस आहे. कदाचित अनावधानाने चूक झाली असेल, होत असेल तर मला जरुर सांगत जा. तुमच्या प्रेमाचा माझ्याकडून अवमान होणार नाही.’ असंही उदयनराजे म्हणाले.
खरंच आज फार बोलण्यापेक्षा एकच सांगतो आज तुमच्यामुळे मी आहे. इतरांसारखं कोणी बोलत असेल की, माझ्यामुळे सगळं जग आहे. पण मी सांगतो, समाजामुळे आमच्यासारखे लोकं आहेत. हे मी कदापि विसरणार नाही.' असंही उदयनराजे म्हणाले.
दरम्यान, उदयनराजे भोसलेंच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
उदयनराजेंचा अल्पपरिचय
उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. यापूर्वी 2009 ची लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती.
तरुणांमध्ये ते सर्वाधिक लोकप्रिय आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही, उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.
Whether it is power or not, till the end, Jagan will be here for you: Udayanraje
"It does not cost me much money or it does not cost much. But, as long as you have the strength. Then you will fight for all of you. "Udayanraje Bhosale, MP, won the hearts of the attendees. Special arrangements were organized in Satara on the occasion of 51st birthday of Udayan Raza. At that time he was speaking. Chief Minister Devendra Fadnavis and NCP chief Sharad Pawar had attended the function, along with many dignitaries. Udayan Raje Bhosale, Satara MP, is today 51st birthday. Udayanrajeni prepared a strong demonstration on this occasion. A Jangi program was organized for his birthday.
Chadrapati Shivaji Maharaj firstly respects this place. Sharad Pawar, who came to bless me and thank you all the people. When all the celebrities were expressing their thoughts, then I had been looking around here that everybody had planted every tree here ... ... praised me for lack of reason, so my mind was overwhelmed. But it really does. Tomorrow, today and tomorrow, what you do, will make you as my duty by keeping the respect of all of you and these people. It will not fall anywhere. Udayan Raje said at this time.
Udayanaraje Bhonsle Bio
Udayanraje Bhosale is the 13th descendant of Chhatrapati Shivaji Maharaj. Presently he is a member of the Nationalist Congress Party. Earlier, he had contested the 2009 Lok Sabha election on Congress ticket.
They are the most popular among young people. Despite the Modi wave in the 2014 Lok Sabha elections, Udayan Raje Bhosale was elected to the Nationalist Congressional election by a large margin.



No comments:
Post a Comment